कोलकाता, : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर इंग्लंडचा संघ भारतामध्ये येणार आहे. या दौऱ्यात नेमके किती सामने खेळवले जाणार, हे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आज जाहीर केले. या दौऱ्यात अहमदाबादच्या नवीन मैदानात दिवस-रात्र सामना खेळवण्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेला इंग्लंडचा संघ चार कसोटी सामने खेळणार आहे. त्याचबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही आयोजित करण्यात येणार आहे. पण या दौऱ्यात सर्वात जास्त ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असल्याचे आज गांगुली यांनी स्पष्ट केले. अहमदाबादमध्ये सर्वात मोठे स्टेडियम बांधण्यात आलेले आहे. या मैदानात आयपीएलचे सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस होता. पण यावर्षी आयपीएल युएईमध्ये खेळवले गेले, त्यामुळे या मैदानात अजून एकही सामना खेळवण्यात आलेला नाही. पण अहमदाबादच्या या मैदानात इंग्लंडविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येईल, अशी जोरदार चर्चा होती. पण याबाबतची स्पष्ट भूमिका अद्याप बीसीसीआयने घेतलेली नाही. याबाबत सौरव गांगुली म्हणाले की, " इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात येणार आहे. दौऱ्यामध्ये दोनच संघ असतात, त्यामुळे गोष्टी हाताळण्यासाठी जास्त कठिण नसतात. पण तरीही आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. काही लोकं बोलत आहेत की, करोनाची दुसरी लाट येणार आहे. त्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे." ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याबाबत गांगुली म्हणाले की, " आयपीएल संपल्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला होता. ११ नोव्हेंबरला भारतीय संघ युएईहून ऑस्ट्रेलियासाठी निघाला होता. त्यानंतर भारतीय संघाची करोना चाचणी घेण्यात आली आणि त्यांना काही दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. आज भारतीय संघाचा क्वारंटाइनचा कालावधी संपत आहे. त्यामुळे आता भारतीय संघ मैदाात उतरण्यासाठई सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये करोनाचा जास्त प्रभाव पाहायला मिळत नाही. त्यामुळे भारतीय संघ आता आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झालेला आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39cUqpq
No comments:
Post a Comment