नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा मजेशीर व्हिडीओ बनवत असतो. वॉर्नरने आता एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये तो बॉलीवूडमधील बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन बनलेला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांनी डोक्यावर घेतला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. भारतीय सिनेमांबद्दल वॉर्नरला प्रेम आहे. आतापर्यंत त्याने बरेच व्हिडीओ भारतातील गाण्यांवर बनवले आहेत. पण आता तर चक्क वॉर्नरने अमिताभ यांचासारखा चेहरा करून एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये वॉर्नर काही संवाद म्हणत आहे. त्याचबरोबर वॉर्नरने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. वॉर्नरने या व्हिडीओखाली काही प्रश्नही विचारले आहेत. मी जो व्हिडीओमध्ये संवाद म्हणण्याचा प्रयत्न करत आहे, तो कोणत्या चित्रपटातील आहे आणि मी ज्यांच्या अभिनय करत आहे, ते महान कलाकार कोण आहेत, असे दोन प्रश्न यावेळी वॉर्नरने विचारले आहेत. या दोन्ही प्रश्नांपैकी दुसरा प्रश्न तसा सोपा आहे. पण पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना नक्कीच थोडा विचार करावा लागेल. वॉर्नरच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर नेमके काय असेल, याचा विचार तुम्ही करत असाल. ततर बॉलीवूडमध्ये अमिताभ यांचा बदला नावाचा एक सिनेमा आला होता. त्यामध्ये अमिताभ यांनी अशी भूमिका साकारली होती. या सिनेमातील अमिताभ यांच्या चेहऱ्यावर वॉर्नरने आपला चेहरा पेस्ट केला आहे आणि तो चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33ba1Sj
No comments:
Post a Comment