सिडनी, AUS vs IND: ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा या चहलनेच दिल्या. पण या सामन्यात चहलच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. आजच्या पहिल्या सामन्यात चहलने १० षटकांमध्ये तब्बल ८९ धावा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दिल्या. आतापर्यंत भारताच्या फिरकीपटू दिलेल्या या सर्वाधिक धावा असून नकोसा विक्रम चहलच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम चहलच्याच नावावर होता. कारण चहलने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध एजबस्टन येथे झालेल्या सामन्यात ८८ धावा दिल्या होत्या. त्यामुळे सर्वाधिक धावा देणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीमध्ये पहिल्या दोन क्रमांकांवर चहलचेच नाव पाहायला मिळत आहे. या सामन्यात चहलने ४ वाइड आणि एक नो बॉलही टाकला. त्याचबरोबर ८९ धावा देत एक बळी मिळवला. आयपीएलमध्ये चहलने दमदार कामगिरी केली होती. आरसीबीकडून खेळताना चहल भेदक गोलंदाजी करत होता. आरसीबीचा तो गोलंदाजीतील हुकमी एक्का होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्या चहलच्या गोलंदाजीवर मोठ्या प्रमाणात धावा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वसूल केल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. चहल- १० षटकात ८९ धावा जडेजा- १० षटकात ६३ धावा सैनी- १० षटकात ८३ धावा बुमराह- १० षटकात ७२ धावा शमी- १० षटकात ५९ धावा यजमान ऑस्ट्रेलियाने पाहूण्या भारतीय संघाचे धमाकेदार स्वागत केले आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ६ बाद ३७५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक केले. भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या ओव्हरपासून भारतीय गोलंदाजांवर वचर्स्व ठेवले. दोघांनी पहिल्या विकटेसाठी १५६ धावांची भागिदारी केली. मोहम्मद शमीने वॉर्नरची विकेट घेतली. शमीच्या चेंडूवर वॉर्नरने मारलेला चेंडू विकेटकीपर केएल राहुलच्या हातात गेला. अंपायरने नाबाद दिल्यानंतर विराट कोहलीने DRS घेतला. त्यावर भारताला पहिले यश मिळाले. वॉर्नरने ७६ चेंडूत ६९ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्टिव्ह स्मिथने टी-२० स्टाईलने फलंदाजी सुरू केली. त्याने फक्त ३६ चेंडूत ५० धावा केल्या. दुसऱ्या बाजूला कर्णधार फिंचने भारताविरुद्धचे चौथे शतक ११७ चेंडूत पूर्ण केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3l5ONeQ
No comments:
Post a Comment