Ads

Wednesday, November 25, 2020

Ind vs Aus: पहिल्या वनडेत कोणाला संधी मिळणार? जाणून घ्या भारताचा संभाव्य संघ

नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांदरम्यान प्रथम तीन सामन्यांची वनडे त्यानंतर टी-२० आणि मग कसोटी मालिका खेळली जाणार आहे. वनडे मालिकेची सुरूवात २७ नोव्हेंबरपासून होणार आहे. या मालिकेत विराट कोहली कोणत्या ११ खेळाडूंना संघात संधी देणार आहे ते जाणून घेऊयात... भारतीय वेळेनुसार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पहिली वनडे सुरू होईल. सिडनी क्रिकेट मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ उपकर्णधार रोहित शर्माशिवाय मैदानात उतरेल. त्यामुळे या सामन्यात शिखर धवन आणि मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला उतरू शकते. संघात केएल राहुलचा देखील समावेश केला जाऊ शकतो. तो विकेटकिपर आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. कारण वनडे संघात ऋषभ पंतचा समावेश केला गेला नाही. वाचा- तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली असेल. तो नेहमी याच क्रमांकावर फलंदाजी करतो. नंबर चारवर श्रेयस अय्यर असेल तर पाचव्या क्रमांकावर राहुल असेल. हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो. हार्दिकने आयपीएलच्या १३व्या हंगामात गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे भारतीय संघासाठी ती थोडी डोकेदुखी ठरू शकते. वाचा- गोलंदाजीत अष्ठपैलू रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी आणि जसप्रित बुमराह यांच्यासह कोहली मैदानात उतरू शकतो. यजमान ऑस्ट्रेलिया संघात फार बदल होतील असे वाटत नाही. भारताचा संभाव्य संघ शिखर धवन, मयांक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर),हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह वाचा- ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, एलेक्स कॅरी (विकेटकिपर), मार्कस स्टायोनिस, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम जम्पा आणि जोश हेजलवुड भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक जाणून घ्या आणि हे सामने कुठे पाहाल.... वनडे मालिका १) पहिली वनडे- २७ नोव्हेंबर, सिडनी २) दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी ३) तिसरी वनडे- २ डिसेंबर, मानकुआ ओव्हल (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१० वाजता सुरू होतील) --- टी-२० मालिका १) पहिली टी-२०: ४ डिसेंबर, मानकुआ ओव्हल २) दुसरी टी-२०: ६ डिसेंबर, सिडनी ३) तिसरी टी-२०: ८ डिसेंबर, सिडनी (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.४० वाजता सुरू होतील) --- सराव लढती ६ ते ८ डिसेंबर- सराव सामना, ड्रमोनी ओव्हल, सिडन ११-१३ डिसेंबर- सराव सामना (डे-नाइड), सिडनी --- कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा ( पहिली डे नाइट कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता. सुरु होईल. तर अन्य तीन सामने पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fvIjEO

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...