सिडनी : आपण देशाशी कटिबद्ध आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करून संघाला विजय मिळवून द्यायचा, यालाच कमिटमेंट असं म्हणतात. हीच गोष्ट घडीला ती ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथच्या बाबतीत. कारण भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी स्मिथला उभेही राहता येत नव्हते. पण तरीही तो देशासाठी मैदानात उतरला आणि शतक झळकावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी स्मिथला सकाळपासून चक्कर येत होती. त्यामुळे स्मिथला जास्त काळ उभे राहणेही शक्य होत नव्हते. पण त्यावेळी स्मिथने देशहिताचा विचार केला आणि काहीही करून आपण सामना खेळणार असल्याचे त्याने संघ व्यवस्थापनाला कळवले होते. पण स्मिथ यावेळी फक्त मैदानात उभा राहीला नाही, तर धडाकेबाज शतक झळकावत दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. याबाबत स्मिथ म्हणाला की, " दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सकाळी मला चक्कर येत होती. त्यावेळी नेमकं काय करायचं हे सुचत नव्हतं. कारण या चक्करमुळे मला समस्या जाणवत होती. त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी माझ्यावर काही उपचार केले. डॉक्टरांनी सहावेळा माझे डोके जोरात फिरवले. त्यामुळे मला बरे वाटू लागले. त्यामुळेच मी हा सामना खेळू शकलो आणि संघाच्या कामी येऊ शकलो. जेव्हा मी मैदानात आलो होतो तेव्हा काही काळ मला थोडे अस्वस्थ वाटत होते. पण एकदा फलंदाजी करायला सुरुवात केल्यावर मात्र मी फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचाच विचार करायला लागलो होतो. त्यामुळेच माझ्याकडून संघाला उपयोगी पडणारी खेळी होऊ शकली." स्मिथने भारताविरुद्ध रविवारी धडाकेबाज शतकी खेळी साकारली. स्मिथने यावेळी फक्त ६४ चेंडूंत १०४ धावांची तुफानी खेळी साकारली. स्मिथच्या या झंझावाती खेळीच्या जोरावरच प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला ३८९ अशी विशाल धावसंख्या उभारता आली. स्मिथच्या या खेळीच्या ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा होता. कारण ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fTaEFh
No comments:
Post a Comment