सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत ३७५ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था बिकट झाली होती. मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेल्या हार्दिक पांड्याने ( ) सूत्रे स्वत:च्या हातात घेतली. त्याने शिखर धवनसह १२८ धावांची भागिदारी केली. यात त्याने भारताकडून एक नवा विक्रम केला. गेल्या काही काळापासून अष्ठपैलूची भूमिका पार पाडत आहे. पण सध्या तो गोलंदाजी न करता एक फलंदाज म्हणून खेळत आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याने गोलंदाजी केली नाही. फलंदाज म्हणून किती धडाकेबाज खेळी करू शकतो हे त्याने दाखवून दिले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत तो त्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. हार्दिकने फक्त ३१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकात त्याने ४८वी धावा घेतात भारताकडून इतिहास घडवला. वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी चेंडूत एक हजार धावा करण्याचा विक्रम हार्दिकने स्वत:च्या नावावर केला. याबाबत त्याने केदार जाधवला मागे टाकले. वनडेत सर्वात कमी चेंडूत १ हजार धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलच्या नावावर आहे. त्याने ७६७ चेंडूत १ हजार धावा केल्या आहेत. तर हार्दिकने ८५७ चेंडूत १ हजार धावा केल्या. भारताकडून याआधी केदार जाधवने ९३७ चेंडूत १ हजार धावा केल्या. सर्वात कमी डावात १ हजार धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या फखर जमाच्या नावावर आहे. त्याने १८ डावात एक हजार धावा केल्या. तर दुसऱ्या स्थानावर इमाम उल हक आहे. हार्दिकने या सामन्यात ७६ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकारांसह ९० धावा केल्या. त्याचे शतक १० धावांनी हुकले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HGz1JG
No comments:
Post a Comment