सिडनी: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अर्थात सीएने महिला बिग बॅश लीग () स्पर्धेतील संघाला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तब्बल २५ हजार डॉलर जवळपास १९ लाख रुपयांचा दंड केला आहे. या संघाने अधिकृतपणे संघात नसलेल्या एका खेळाडूचा समावेश केल्याने ही कारवाई करण्यात आली. वाचा- शनिवारी रात्री सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न रेनेगाडेस यांच्यात लढत झाली. या लढतीत सिडनी सिक्सर्स संघाने जलद गोलंदाज हेले सिल्व्हर-होम्सची निवड केली. काही दिवसांपूर्वी हेले दुखापतीतून बाहेर झाली होती. पण बिग बॅश स्पर्धेतील समितीने तिच्या परतीला मंजूरी दिली नव्हती. परवानगी शिवाय हेलेचा संघात समावेश केल्याने ती निवड अयोग्य ठरवण्यात आली. वाचा- यामुळे हेलेला सिडनी सिक्सर्स संघाकडून फलंदाजी करता आली नाही. कारण ही चूक दुसरा डाव सुरू करण्याआधी निश्चित करण्यात आली. सिक्सर्स संघाला या चुकीची कल्पना देण्यात आली आणि त्या सोबत दंड देखील करण्यात आला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटीग्रिटी आणि सुरक्षा प्रमुख सीन कॅरल म्हणाल्या, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या सर्व स्पर्धेत प्रामाणिकपणाला महत्त्व दिले आहे. या स्पर्धेतील नियमांचे पालन करणे खेळाडूंना बंधनकारक आहे. वाचा- सिडनी सिक्सर्सकडून करण्यात आलेली चूक गंभीर आहे. काल रात्री मैदानावर जे काही झाले त्याचा क्लब क्रिकेटवर वाइट परिणाम होऊ शकतो. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fr8qg7
No comments:
Post a Comment