India Tour Of Australia 2020 करोना व्हायरसच्या काळात आयपीएलचा १३वा हंगाम झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल झाले आहेत. विराट सेना पुन्हा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर पराभूत करण्यास सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ने पराभूत केले होते. या वर्षी देखील भारतीय खेळाडू पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात धमाकेदार कामगिरी करण्यास सज्ज झाले आहेत. भारतीय संघातील काही खेळाडू असे आहेत ज्यांचा हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरू शकतो. भारतीय संघ या दौऱ्यात प्रत्येकी ३ वनडे आणि टी-२० मालिका आणि त्यानंतर ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जाणून घेऊयात असे कोणते खेळाडू आहेत ज्याचा हा अखेरचा दौरा ठरू शकतो.

या खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलिया दौर असेल अग्निपरीक्षा

वृद्धिमान साहा
वृद्धिमान साहा- आयपीएलच्या अखेरच्या काही सामन्यात साहाने सनरायजर्स हैदराबादकडून सलामीला येत धमाकेदार फलंदाजी केली होती. साहा सध्या ३६ वर्षांचा आहे आणि त्यामुळेच त्याचा हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो. निवड समितीने साहा सोबत राखीव खेळाडू म्हणून ऋषभ पंतचा संघात समावेश केला आहे. पंतने गेल्या दौऱ्यात शतक झळकावले होते. जर यावेळी त्याने चांगली कामगिरी केली तर साहा पुढच्या दौऱ्यात टीम इंडियात नसेल.
इशांत शर्मा
इशांत शर्मा- ३२ वर्षीय इशांत शर्मासाठी ऑस्ट्रेलिया दौरा एक आव्हानात्मक असेल. इशांत अद्याप दौऱ्यासाठी फिट झालेला नाही. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत आहे. जर तो फिट नाही झाला तर मालिका खेळू शकणार नाही. वनडे आणि टी-२० संघात स्थान मिळवण्याच्या स्पर्धेत इशांत मागे पडला आहे. पण कसोटी संघात तो सर्वात सिनिअर खेळाडू आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघात तो महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो. दुखापतीमुळे जर तो यावर्षी खेळू शकला नाही तर त्याला देखील पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
उमेश यादव
उमेश यादव- परदेशातील खेळपट्टीवर वेगाने चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाची गरज असते. उमेश यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धमाकेदार गोलंदाजी करू शकतो. पण त्याचा देखील हा अखेरचा दौरा ठरू शकतो. सध्या तो ३३ वर्षाचा आहे. भारत पुन्हा जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येईल तेव्हा त्याचे वय आणि फिटनेस यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील. जर यावेळी उमेशने धमाकेदार गोलंदाजी केली नाही तर नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज सारखे जलद गोलंदाज त्याची जागा घेतील.
आर अश्विन
आर अश्विन- भारतीय संघाचा मायभूमीतील दौरा असो की विदेशातील दौरा आर अश्विन प्रत्येक ठिकाणी गोलंदाजीने कमाल करतो. त्यामुळे तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा घटक असतो. अश्विन सध्या ३४ वर्षाचा आहे. त्याने ७१ कसोटी सामन्यात ३६५ विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याचा हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरू शकतो असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. वय वाढल्यानंतर चांगली गोलंदाजी करणे शक्य होईलच असे नाही. जर त्याने या दौऱ्यात विजयी भूमिका पार पाडली तर पुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचा विचार केला जाईल.
अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे- अजिंक्य भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात रहाणेला फार चांगली कामगिरी करता आली नाही. इतक नव्हे तर त्याने अखेरची चांगली फलंदाजी करून बराच काळ लोटला आहे. या वर्षी विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परत येणार आहे. तेव्हा अजिंक्यवर कर्णधारपदाची जबाबदारी येऊ शकते. अजिंक्य ३२ वर्षाचा आहे आणि हा दौरा त्याची अग्निपरीक्षा असेल. या दौऱ्यात अजिंक्यला धमाकेदार फलंदाजी करून जागा टीकवावी लागणार आहे. तसे नाही झाले तर अजिंक्यचा हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39b6VBH
No comments:
Post a Comment