नवी दिल्ली : करोनाची लाट येत्या काही दिवसांमध्ये भारतामध्येही दाखल होणार आहे, असे म्हटले जात आहे. आता पुढील वर्षभर भारतीय क्रिकेट संघाच्या स्पर्धा सुरुच असणार आहेत. पण जर करोनाची दुसरी लाट आली तर नेमकं काय करावं लागणार आहे, याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपले मत व्यक्त केले आहे. करोनाची दुसरी लाट आली तर नेमकं काय करायला हवं, याबाबतही गांगुली यांनी आपले मत व्यक्त केले आहे. करोनाची दुसरी लाट काही दिवसांमध्ये दाखल होईल, असे म्हटले जात आहे. बीसीसीआयने करोनाच्या काळात आयपीएलचे यशस्वी आयोजन केले होते. त्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. त्यानंतर भारतामध्ये इंग्लंडचा संघ येणार असून तीन क्रिकेट मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बीसीसीआयलाही बसू शकतो. पण यावेळी सावधगिरीचा उपाय म्हणून नेमकं काय करायला हवं, याबाबत गांगुली यांनी आपले मत व्यक्त केले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत गांगुली म्हणाले की, " आता सर्व दौरे असल्याने फक्त दोनच संघ असतील, त्यामुळे थोडं कमी दडपण आमच्यावर असेल. बरीचं जणं करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत बोलत आहेत. हे सर्व आम्हीही ऐकून आहोत. त्यामुळेच आम्ही सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती कशी हाताळता येईल, याकडे आमचे बारकाईने लक्ष आहे. त्याचबरोबर आपल्याला आता अधिक काळजी घेण्याचीही गरज आहे." भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत गांगुली नेमकं काय म्हणाले, पाहा...आयीपीएल संपल्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला होता. ११ नोव्हेंबरला भारतीय संघ युएईहून ऑस्ट्रेलियासाठी निघाला होता. त्यानंतर भारतीय संघाची करोना चाचणी घेण्यात आली आणि त्यांना काही दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. आज भारतीय संघाचा क्वारंटाइनचा कालावधी संपत आहे. त्यामुळे आता भारतीय संघ मैदानात उतरण्यासाठई सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये करोनाचा जास्त प्रभाव पाहायला मिळत नाही. त्यामुळे भारतीय संघ आता आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळत आहे, असे गांगुली यांनी यावेळी सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/399NNUz
No comments:
Post a Comment