Ads

Friday, November 27, 2020

AUS vs IND: रोहित शर्माच्या जागेवर हक्क सांगणारे तिन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात झाले फेल

सिडनी, AUS vs IND: रोहित शर्माने आतापर्यंत भारताला बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. रोहितच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले होते. पण दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. पण रोहितच्या जागेवर हक्क सांगणारे भारताचे तीन फलंदाज पहिल्याच सामन्या नापास झाल्याचे पाहायला मिळाले. रोहित ऑस्ट्रेलियामध्ये मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर त्याच्या जागी सलामीला मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला पाठवण्यात येईल, असे भारतीय संघाकडून समजले होते. पहिल्या सामन्यात मयांकला शिखर धवनबरोबर सलामीला जायची संधी देण्यात आली. पण आयपीएल गाजवणाऱ्या मयांकला या सामन्यात २२ धावांवर समाधान मानावे लागले. लोकेश राहुलने आयपीएलमध्ये धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे रोहितची जागा राहुल घेऊ शकतो, असे म्हटले जात होते. आजच्या सामन्यात राहुलला पाचव्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्यात आले. पण राहुलही या सामन्यात अपयशी ठरला. कारण राहुलला या सामन्यात १२ धावाच करता आल्या. संघ अडचणीत सापडल्यावर राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण राहुलने फुलटॉस चेंडूवर आपली विकेट बहाल केल्याचे पाहायला मिळाले. रोहित जर कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसेल तर त्याच्याजागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात येईल, असा इशारा भारतीय संघाकडून देण्यात आला होता. श्रेयस जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारताने ९.३ षटकांमध्ये दोन विकेट्स गमावल्या होत्या. भारताने कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर मयांक अगरवालला गमावले होते. त्यानंतर श्रेयसकडून भारताच्या चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. पण त्यानंतर श्रेयसला फक्त दोन चेंडूंचाच सामना करता आला. आपल्या पहिल्या चेंडूवर श्रेयसने दोन धावा काढल्या आणि त्यानंतरच्या चेंडूवर तो विचित्रपणे बाद झाला. श्रेयसने डोळे बंद करून आपली विकेट गमावली, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. हेझलवूडने नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक बाऊन्सर टाकला. त्यावेळी श्रेयसने हा बाऊन्स सोडून द्यायला हवा होता. पण या बाऊन्सचा सामना करताना श्रेयसचे डोळे बंद झाल्याचे पाहायला मिळाले आणि तो फटका मारायला गेला. यावेळी श्रेयसच्या बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. त्यामुळे श्रेयसला फक्त दोन धावा करता आल्या आणि भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस ज्यापद्धतीने आऊट झाला ते पाहिल्यावर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39xx9yH

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...