सिडनी: भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून याची सुरूवात २७ तारखेला वनडे मालिकेपासून होणार आहे. भारतीय संघ प्रत्येकी ३ वनडे आणि टी-२० तर ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामाक मंडळ अर्थात बीसीसीआयने ही गोष्टी स्पष्ट केली होती की, पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे. तो बाप होणार असून पत्नी अनुष्कासाठी तो भारतात येणार आहे. वाचा- भारताचा दौरा अद्याप सुरू झाला नाही पण त्याआधीच एक मोठा प्रश्न सर्व जण विचारत आहेत. तो म्हणजे, विराट कोहीलच्या गैरहजेरीत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार. भारतीय संघातील कोणता खेळाडू आहे जो विराटची जागा घेऊ शकतो याची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने टीम इंडियाच्या कर्णधारपदाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. वाचा- वॉर्नरच्या मते, विराटची जागा घेण्यासाठी भारतीय संघात एक किंवा दोन नव्हे तर ३ ते ४ खेळाडू आहेत. पण विराटच्या तुलनेत अजिंक्य रहाणेचे नेतृत्व एक वेगळा दृष्टीकोण आणेल. रहाणे हा अतिशय शांत आणि चांगल्या अप्रोचने खेळतो. त्याच्याकडे चांगले क्रिकेट आहे. एक खेळाडू म्हणून मैदानात राहण्यासाठी तो मेहनत घेतो. भारताकडे असे चार खेळाडू आहेत जे कोणत्याही क्षणी नेतृत्व करू शकतात. वाचा- वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pSYIIm
No comments:
Post a Comment