सिडनी : मला आणि माझ्या पत्नीला जेव्हा पहिलं बाळ झाले तेव्हा मी बीसीसीआयकडे मायदेशी परतण्याची परवानगी मागितली नव्हती. मी दौऱ्यावर असताना आमच्या कुटुंबामध्ये नवीन पाहुणा येणार आहे, हे मला माहिती होती. पण मी भारतीय संघाकडून खेळण्यासाठी कटिबद्ध होतो. मला त्यावेळी भारतीय संघाचे हीत महत्वाचे वाटले. माझ्या पत्नीनेही या माझ्या निर्णयाचे स्वागत केले होते, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. गावस्कर यांचे हे वक्तव्य म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहलीला अप्रत्यक्षरीत्या टोला आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिका गमावली आहे. कोहली हा वनडे, ट्वेन्टी-२० मालिका पूर्ण खेळणार आहे. पण त्यानंतर फक्त एक कसोटी सामना खेळूनच तो मायदेशी परतणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये कोहलीच्या घरी पाळणा हलणार आहे. त्यामुळे कोहली संपूर्ण कसोटी मालिका खेळणार नाही. त्यामुळेच कोहलीवर आता काही चाहत्यांकडून टीका होताना दिसत आहे. कारण कोहलीसाठी देशाचे हित महत्वाचे आहे की कुटुंब, असा सवालही आता चाहते विचारायला लागले आहे. गावस्कर पुढे म्हणाले की, " भारतीय संघ १९७५-७६ साली न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. त्यामुळे माझ्या घरी एक नवीन पाहुणा आला होता, माझ्या मुलाचा जन्म झाला होता. त्यावेळी मी न्यूझीलंडमध्ये खेळत होतो. पण न्यूझीलंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात मला दुखापत झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी मला चार आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी मी संघाचे व्यवस्थापक पॉली उम्रीगर यांनी घरी जाण्याची विनंती केली होती. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, मी विश्रांतीच्या काळात घरी माझ्या पैशांनी जाऊन येतो. त्याचबरोबर मी वेस्ट इंडिजमध्ये पहिल्या कसोटी सामन्यासाठीही उपलब्ध असेन. त्यावेळी मला घरी जाण्याची परवानगी दिली होती आणि त्यानंतर मी वेस्ट इंडिजमध्ये जाऊ पहिला कसोटी सामनाही खेळलो होतो." गावस्कर यांनी पुढे सांगितले की, " जर मला दुखापत झाली असती तर मी वेस्ट इंडिजमध्ये पहिला सामना खेळू शकलो नसतो. पण वेस्ट इंडिजमध्ये पोहोचल्यावर मला डॉक्टरांनी एक आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. पण त्यावेळी मला खेळण्याची जास्त गरज होती, असे मला वाटले. त्यामुळे मी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळलो होतो."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37ikgFK
No comments:
Post a Comment