मुंबई : आयपीएल न खेळताच माघारी आल्यामुळे सुरेश रैनावर काही जणांनी टीका केली होती. पण आता रैना आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक मोठे का करणार आहे. रैनाच्या या कामामुळे १० हजार शाळकरी मुलांचा प्रश्न सुटणार असल्याचे पाहायला मिळत आहे. रैनाचा वाढदिवस शुक्रवारी २७ नोव्हेंबरला आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून रैनाने ३४ सरकारी शाळांमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे जवळपास १० हजार मुलांना स्वच्छ पाणी मिळणार आहे. रैनाने आपल्या मुलीच्या नावाने ग्रासिया रैना फाऊंडेशन सुरु केले आहे. रैनाने यावेळी आपल्या फाऊंडेशनबरोबर अमिताभ शहा यांच्या 'युवा अनस्टॉपेबल' या सामाजिक संस्थेबरोबर मिळून हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. रैना यावेळी उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि एनसीआर या भागांतील ३४ सरकारी शाळांमध्ये हे काम करणार आहे. काही सरकारी शाळांमध्ये मुलांना स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही, ही समस्या रैनाला समजली होती. त्यावर नेमकं काय करायचं, याचा विचार रैना करत होता. त्यानंतर रैनाने हे काम हाती घ्यायचे ठरवले. या कामाबरोबरच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे मिळेल, यावर रैना आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करणार आहे. भविष्यामध्ये आणखी काही शाळांध्ये विविध ुपक्रम राबवण्याचा रैनाचा मानस आहे. भविष्यात रैना नेमकं काय करणार आहे, याबाबतही त्याने आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत रैना म्हणाला की, " प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर शिक्षण घेत असताना त्यांना चांगल्या सुविधाही मिळायला हव्यात, असे मला वाटते. शाळकरी मुलांना स्वच्छ पाणी आणि चांगले शिक्षण मिळायला हवे, यासाठी मी काम करत आहे. या गोष्टीचा फायदा हजारो मुलांना होणार आहे. भविष्यामध्ये अधिक शाळांतील मुलांच्या समस्या कशा सोडवल्या जाऊ शकतात, याचा विचार मी करत आहे. त्यानुसार भविष्यात आणखी काही चांगली कामे करण्याचा माझा मानस आहे. पण सध्याच्या घडीला या कामाने मी सुरुवात करत आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UTA6kk
No comments:
Post a Comment