नवी दिल्ली: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरूवात २७ तारखेपासून वनडे मालिकेने होणार आहे. या दौऱ्यात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे, ३ टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार () वनडे, टी-२० आणि फक्त एकच कसोटी सामना खेळणार आहे. विराट जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाप होणार आहे. यासाठी तो सुट्टीवर जाणार असून बीसीसीआयने त्यासाठी परवानगी दिली आहे. वाचा- देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार () यांनी विराटच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले, मला वाटत नाही की विराटने भारतात येण्याचा आणि पुन्हा परत जाण्याचा धोका पत्करू नये. सुनील गावसकर यांनी त्यांच्या मुलाला जन्मानंतर अनेक महिने पाहिले नव्हते. पण ती गोष्टी वेगळी होती. आता गोष्टी बदलल्या आहेत. जर विराटच्याबाबत बोलायचे झाले तर जेव्हा त्याच्या वडिलाचे निधन झाले होते तेव्हा तो दुसऱ्या दिवशी क्रिकेट खेळण्यास आला होता. आज तो बाळाच्या जन्मासाठी सुट्टी घेत आहे. यात हरकत घेण्यासारखे नाहीच नाही. वाचा- देव यांनी त्यांच्या काळातील गोष्टी किती वेगळ्या होत्या हे सांगितले. आजच्या खेळाडूंना ज्या सुविधा दिल्या जात आहेत. तशा सुविधांच्या बाबत जुने खेळाडू विचार देखील करू शकत नाहीत. आज तुम्ही एक विमान विकत घेऊ शकता आणि तीन दिवसात पुन्हा परत येऊ शकता. मला आनंद आणि गर्व वाटतो की, आजचे खेळाडू एका स्तरावर पोहोचले आहेत की ते असे करू शकतात. मी विराटसाठी आनंदी आहे. तो त्याच्या कुटुंबाला पाहण्यासाठी परत येतोय. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक जाणून घ्या आणि हे सामने कुठे पाहाल.... वनडे मालिका १) पहिली वनडे- २७ नोव्हेंबर, सिडनी २) दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी ३) तिसरी वनडे- २ डिसेंबर, मानकुआ ओव्हल (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१० वाजता सुरू होतील) --- टी-२० मालिका १) पहिली टी-२०: ४ डिसेंबर, मानकुआ ओव्हल २) दुसरी टी-२०: ६ डिसेंबर, सिडनी ३) तिसरी टी-२०: ८ डिसेंबर, सिडनी (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.४० वाजता सुरू होतील) --- सराव लढती ६ ते ८ डिसेंबर- सराव सामना, ड्रमोनी ओव्हल, सिडन ११-१३ डिसेंबर- सराव सामना (डे-नाइड), सिडनी --- कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा ( पहिली डे नाइट कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता. सुरु होईल. तर अन्य तीन सामने पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/336OJFk
No comments:
Post a Comment