सिडनी : आयपीएल संपल्यावर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक आता भारताविरुद्ध रणनिती आखायला तयार झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नेट्समध्ये आता पॉन्टिंग नेमकं काय करत आहे, पाहा... आयपीएल संपल्यावर पॉन्टिंग थेट ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये दाखल झाला. पॉन्टिंग बराच काळ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सराव देन मार्गदर्शन करत आहे. त्याचबरोबर नेट्समध्ये पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना फलंदाजीचा सराव करून देत आहे. कोणत्या चेंडूवर कसे फटके आणि कुठे मारायचे, याचे मार्गदर्शन पॉन्टिंग करताना दिसत आहे. त्याचबरोबर भारताला पराभूत करण्यासाठी पॉन्टिंग रणनिती आखत असल्याचेही पाहायला मिळाले आहे. पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलियाच्या संघाचा मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्याबरोबर पॉन्टिंग भारताला कसे पराभूत करता येईल, याची रणनिती आखत आहे. सध्याच्या घडीला पॉन्टिंग क्वारंटाइनमध्ये आहे. पण तरीही ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी पॉन्टिंग रोज मैदानात उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकवेळ खेळाडू थकत असले तरी पॉन्टिंग मात्र थकलेला दिसत नाही. याबाबत ऑस्ट्रेलियाच्या संघातील अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने सांगितले की, " पॉन्टिंग एक खेळाडू म्हणून कसे होते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण एक प्रशिक्षक म्हणूनही ते फारच चांगले आहेत. पॉन्टिंग तुम्हाला आत्मविश्वास देताात, त्याचबरोबर तुमचे नेमके कुठे चुकते आणि त्यासाठी काय करायला हवे, याचे मार्गदर्शनही करतात. त्यामुळे एक प्रशिक्षक म्हणून त्यांची कामगिरीही उत्तम आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता तेव्हा ते कसे प्रशिक्षक आहे, हे समजून चुकते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35SKyPe
No comments:
Post a Comment