tour of : दक्षिण ऑस्ट्रेलियात करोनाचा प्रभाव एका दिवसात झपाट्याने वाढला होता. त्यामुळेच अॅडलेड येथे असलेल्या ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय क्रिकेट मंडळाने घेतला होता. त्यानंतर येथे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या सरकारने घेतला होता. त्यामुळे आता अॅडलेड येथे पहिला सामना होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पण याबाबतचे अपडेट्स आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने दिले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे. २७ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडवर होणार असून ही लढत दिवस-रात्र असणार आहे. करोनामुळे अॅडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यावर संभ्रमाचे ढग निर्माण झाले होते. पण आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शनिवारी येथील लॉकडाऊन हटवण्यात येणार आहे. त्यामुळे अॅडलेड येथे सामना होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. जर लॉकडाऊन उठवले गेले असेल तर अॅडलेडमध्ये पहिला कसोटी सामना होऊ शकतो, अशी आशा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला आहे. जर अॅडलेडमध्ये सामना होऊ शकला नाही तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने केली आहे. जर अॅडलेड येथे सामना हो शकला नाही, तर हा सामना सिडनी किंवा मेलबर्न येथे खेलवला जाऊ शकतो. पण आता शनिवारपासून लॉकडाऊन काही प्रमाणात हटवण्यात आले आहे. त्यामुळे अॅडलेडमध्ये हा सामना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कसोटी मालिकेतील हा सामना १७ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. तोपर्यंत स्थिती यापेक्षा चांगली सुधारलेली असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा सामना पुर्वनियोजित वेळेप्रमाणेच होईल, असे संकेत आता मिळत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nKIgbm
No comments:
Post a Comment