Ads

Sunday, November 29, 2020

IND vs AUS : आणखी लाजिरवाणा पराभव; दुसऱ्या वनडेसह भारताने मालिका गमावली

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा ५१ धावांनी पराभव झाला. या पराभवासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी गमावली. ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या सामन्यात भारताला हिमालया एवढे आव्हान दिले होते. स्टीव्ह स्मिथकडून स्फोटक शतकी खेळी केली आणि अन्य चार जणांनी धडाकेबाज अर्धशतक करून संघाला ३८९ पर्यंत मजल मारून दिली. उत्तरादाखल भारताला ९ बाद ३३८ इतक्या धावा करता आल्या. वाचा- ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३९० धावांचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी अर्धशतक करून दिले. पण शिखर ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर मयांक अग्रवाल देखील २८ धावांवर माघारी परतला. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर भारताची अवस्था दोन बाद ६० अशी झाली होती. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. श्रेयस ३८ धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल सोबत विराटने धावांचा वेग वाढवला पण मोठ्या धावसंख्येच्या दडपणात तो ८९ धावांवर बाद झाला. वाचा- वाचा- विराटने ८७ चेंडूत ८९ धावा केल्या. विराट केल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी आक्रमक फलंदाज केली. मोठे शॉट खेळण्याच्या प्रयत्नात राहुल ७६ धावांवर बाद झाला. त्याने ६६ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकार मारले. त्यानंतर रविंद्र जडेजा २४ धावा करून माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. त्याने ३१ चेंडूत २८ धावा केल्या. वाचा- ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३, जोश हेजलवुड, अॅडम जाम्पा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. दोन्ही संघातील तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी दोन डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी दुसऱ्या वनडेत कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंच आणि वॉर्नरने पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात करून दिली. यांनी पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागिदारी केली. फिंच ६० धावांवर बाद झाला त्याने ६९ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकार मारले. शमीने फिंचची विकेट घेतली. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरला श्रेयस अय्यरने ८३ धावांवर धावबाद केले. पण गेल्या सामन्यातील शतकवीर स्मिथने धावांचा वेग कमी केला नाही. स्मिथने भारताविरुद्ध सलग दुसरे शतक केले. त्याने फक्त ६२ चेंडूत १०० धावा केल्या. गेल्या सामन्यात देखील त्याने अशीच शानदार फलंदाजी केली होती. त्याला हार्दिक पांड्याने १०४ धावांवर बाद केले. त्यानंतर मार्नस लाबुशानने अर्धशतक पूर्ण केले. अखेरच्या षटकात लाबुशाने आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी धावांचा वेग कायम ठेवत संघाला ३८९ धावांपर्यंत पोहोचवले. मॅक्सवेलने देखील अर्धशतकी खेळी केली. पहिल्या वनडे प्रमाणे या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात एक शतक आणि तब्बल चार अर्धशतकांची नोंद झाली. भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HNorRc

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...