सिडनी, : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. पण या सामन्यानंतर भारतीय संघाला अजून एक धक्का बसल्याचे आता पुढे आले आहे. पहिल्या सामन्यानंतर आयसीसीने भारतीय संघाला शिक्षा केली आहे. कारण या सामन्यात भारतीय संघाला निर्धारीत वेळेत आपली ५० षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे आता आयसीसीने भारतीय संघावर दंड ठोठावला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला आपल्या मानधनातील २० टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. सामनाधिकारी आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड बून यांनी भारतीय संघाला निर्धारीत वेळेत आपली ५० षटके पूर्ण करता आली नाहीत, हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आयसीसीने ही कारवाई केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आपली ही चूक मान्य केली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या खेळाडूंच्या मानधनातून आता २० टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे. करोनानंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवत ३७४ धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग कराताना भारताचे चार फलंदाज १४ षटकांत बाद झाले होते. पण त्यानंतर शिखर धवन आणि हार्दिक पंड्यांनी यांनी चांगली भागीदारी रचली. पण भारताचा पराभव मात्र ते टाळू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारताची १४व्या षटकात ४ बाद १०१ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांची चांगली जोडी जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची महत्वाची भागीदारी रचली आणि भारताच्या विजयाचा आशा पल्लवित झाल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने यावेळी धवनला बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. धवनने यावेळी १० चौकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. धवन बाद झाल्यावर काही वेळातच हार्दिकही बाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा धुळीस मिळाल्या पंड्याचे शतक यावेळी १० धावांनी हुकले. पंड्याने यावेळी ७६ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fPI2gb
No comments:
Post a Comment