india tour on australia: ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ सध्याच्या घडीला क्वारंटाइनमध्ये आहे. पण तरीही भारतीय संघातील खेळाडू एकत्र येऊन व्यायाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचा क्रिकेटपटू लोकेश राहुलने आपल्या सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यावर भारतीय संघाची करोना चाचणी झाली. त्यानंतर भारतीय संघाला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. पण क्वारंटाइनमध्ये असूनही भारतीय संघाला सराव आणि व्यायाम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे. २७ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडवर होणार असून ही लढत दिवस-रात्र असणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या घरी जानेवारी महिन्यामध्ये पाळणा हलणार आहे. त्यामुळे कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार असून तो भरतामध्ये परणार आहे. पण कोहली खेळला नाही तरी भारतीय संघ जिंकू शकतो, असे स्पष्ट मत भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. गावस्कर यांनी यावेळी सांगितले की, " विराट कोहलीविनाही भारतीय संघ मजबूत आहे. आतापर्यंत कोहली ज्या सामन्यांमध्ये खेळलेला नाही ते सामने भारताने जिंकलेले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळा येथे झालेल्या कसोटी सामन्यात कोहली खेळला नव्हता, पण भारतीय संघ हा सामना जिंकला होता. श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफीमध्येही कोहली खेळला नव्हता. पण भारताने या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेले होते. त्याचबरोबर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातही कोहली खेळला नव्हता, त्या सामन्यातही भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे कोहली संघात नसला तर संघाचे मोठे नुकसान होईल, असे तरी सध्याच्या घडीला दिसत नाही."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35Rmlcf
No comments:
Post a Comment