सिडनी: क्रिकेटच्या मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये अनेक जण लक्ष वेधून घेण्यासाठी काही हटके गोष्टी करत असतात. ज्यामुळे कॅमेरा त्यांच्यावर येईल. अशीच एक घटना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात घडली. वाचा- वाचा- सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलिया संघाच्या एका महिला चाहतीला प्रप्रोज केले. भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना २१व्या षटकात एका भारतीय संघाच्या चाहत्याने ऑस्ट्रेलिया संघाच्या चाहतीला प्रमोज केले. त्याने गुढघ्यावर बसून हातात अंगठी धरून तिला प्रेमाची विचारणा केली. तेथे उपस्थित असलेल्या अन्य चाहत्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. त्यावर मुलीने होकार देत त्याच्या प्रेमाचा स्विकार केला. वाचा- वाचा- प्रेक्षकांमधील ही घटना पहिल्यानंतर मैदानावर सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलसह अन्य खेळाडूंनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. संबंधित भारतीय चाहता आणि ऑस्ट्रेलियाची चाहती यांच्या प्रतिक्रियेवरून असे वाटत होते की ते एकमेकांना आधीपासून ओळखतात.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36g4dsQ
No comments:
Post a Comment