नवी दिल्ली: करोना व्हायरसच्या लॉकडाउनंतर भारताचा क्रिकेट संघ प्रथमच परदेशी दौऱ्यावर गेला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारतीय संघाच्या या दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबर पासून होणार आहे. भारताच्या दौऱ्याची सुरूवात २७ नोव्हेंबर पासून होणार आहे. प्रथम वनडे मालिका, त्यानंतर टी-२० मालिका होईल. या दोन्ही मालिका प्रत्येकी ३ सामन्यांची होणार आहे. तर कसोटी मालिका चार सामन्यांची होईल. टी-२० लढती झाल्यानंतर दोन सराव सामने होणार आहेत. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलियाची ही कसोटी मालिका आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. या दोन्ही संघात १७ डिसेंबर रोजी पहिला कसोटी सामना होणार आहे. ही लढत डे-नाइट असेल. भारतीय संघाचा १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर पहिला वनडे सामना होणार आहे. या दोन्ही संघातील कसोटी मालिका जास्त अटतटीची होणार आहे. चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक जाणून घ्या आणि हे सामने कुठे पाहाल.... वनडे मालिका १) पहिली वनडे- २७ नोव्हेंबर, सिडनी २) दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी ३) तिसरी वनडे- २ डिसेंबर, मानकुआ ओव्हल (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१० वाजता सुरू होतील) वाचा- --- टी-२० मालिका १) पहिली टी-२०: ४ डिसेंबर, मानकुआ ओव्हल २) दुसरी टी-२०: ६ डिसेंबर, सिडनी ३) तिसरी टी-२०: ८ डिसेंबर, सिडनी (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.४० वाजता सुरू होतील)--- सराव लढती ६ ते ८ डिसेंबर- सराव सामना, ड्रमोनी ओव्हल, सिडन ११-१३ डिसेंबर- सराव सामना (डे-नाइड), सिडनी --- कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा ( पहिली डे नाइट कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता. सुरु होईल. तर अन्य तीन सामने पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36DeSMX
No comments:
Post a Comment