अबुधाबी: आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने IPL 2020चा शेवट मात्र गोड केला आहे. आज रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ९ विकेटनी ( vs ) पराभव केला. चेन्नईच्या या विजयामुळे पंजाबचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले. वाचा- पंजाबविरुद्ध धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी धमाकेदार सुरूवात करून दिली होती. त्यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी सुरू केली होती. पण एगिडीने अग्रवालची बोल्ड घेतली आणि पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर त्यांची गाडी रुळावर आली नाही. १ बाद ४८ वरून त्यांची अवस्था ४ बाद ७२ अशी झाली. राहुल २९, ख्रिस गेल १२, निकोलस पूरन २ धावांवर बाद झाले. पंजाब १२० पर्यंत पोहोचेल का अशी शंका वाटत असताना दीपक हुड्डाने ३० चेंडूत ६२ धावा करत संघाला १५३ अशी समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली. वाचा- पंजाबला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते. पण गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. फाफ डुप्लेसिस आणि (Ruturaj Gaikwad) यांनी ८२ धावांची भागिदारी करत विजयाचा पाया रचला. डुप्लेसिस ४८ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋतुराजने अंबाती रायडूसह चेन्नईला ९ विकेटनी विजय मिळवून दिला. वाचा- ऋतुराजने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली आणि विजय मिळवून दिला. त्याने ४९ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांसह नाबाद ६२ धावा केल्या. अंबाती रायडूने ३० चेंडूत ३० धावा केल्या. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oFEQHY
No comments:
Post a Comment