आबुधाबी: कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने आजच्या करो या मरो सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. खासकरून कोलकाताचा कर्णधार इऑन मॉर्गनने यावेळी राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत अर्धशतक साजरे केले. त्यामुळेच आजच्या महत्वाच्या सामन्यात कोलकाताला राजस्थानपुढे १९२ धावांचे तगडे आव्हान ठेवता आले. मॉर्गनने यावेळी फक्त ३४ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत कोलकाताच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कोलकाताची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. कारण दुसऱ्याच चेंडूवर कोलकाताला यावेळी पहिला धक्का बसला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने यावेळी नितिश राणाला बाद करत कोलकाताला पहिला धक्का दिला. राणाला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. राणा बाद झाल्यावर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांची चांगलीच भागीदारी झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. पण यावेळी राजस्थानच्या राहुल तेवातियाने ही जोडी फोडत राजस्थानला मोठे यश मिळवून दिले. तेवातियाने यावेळी गिलला बाद करत कोलकाताला दुसरा धक्का दिला. गिलने यावेळी २४ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या. तेवातियाने या षटकातच सुनिल नरिनलाही बाद करत कोलकाताला दुहेरी धक्के दिले. नरिनला यावेळी एकही धाव काढता आली नाही. नरिन बाद झाल्यावर काही काळ त्रिपाठी आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांच्यामध्ये थोडी चांगली भागीदारी झाली. पण मोठा फटका मारण्याच्या नादात यावेळी त्रिपाठीने आपली विकेट गमावली. त्रिपाठीला यावेळी ३४ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटाकारांच्या मदतीने ३९ धावा करता आल्या. त्रिपाठी बाद झाल्यावर दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. कार्तिककडून संघाला यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. पण कार्तिकला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. कार्तिक बाद झाल्यावर आंद्रे रसेल फलंदाजीला आला आणि त्याने धडाकेबाज फलंदाजीला सुरुवात केली. पण रसेलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रसेलने यावेळी ११ चेंडूंत १ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर २५ धावा फटकावल्या. एकाबाजूने विकेट्स पडत असल्या तरी कर्णधार मॉर्गन हा खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TI71aX
No comments:
Post a Comment