आबुधाबी: चेन्नई सुपर किंग्सचा संघ या आयपीएलमधील आज अखेरचा सामना खेळत आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीचादेखील या मोसमातील हा अखेरचा सामना असेल, असे म्हटले जात आहे. धोनी या सामन्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेणार आणि यापुढे तो आपल्याला आयपीएलमध्ये दिसणार नाही, अशा चर्चांना उत आला होता. पण स्वत: धोनीने यावर भाष्य केल्याचे पाहायला मिळत आहे. धोनी आजच्या सामन्यासाठी नाणेफेकीला आला. तेव्हा नाणेफेकीसाठी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅनी मॉरिसन तिथे होता. त्यावेळी मॉरिसनने धोनीला विचारले की, " आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून तु अखेरचा सामना खेळत आहेस का?" या प्रश्नावर धोनीने तात्काळ उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. धोनी यावेळी म्हणाला की, ' निश्चितच नाही. माझा हा आयपीएलमधील चेन्नईच्या संघाकडून खेळताना हा अखेरचा सामना नाही.' या मोसमात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर धोनीलादेखील या आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी करता आलेली नाही. आत्तापर्यंतच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नईचा संघ गुणतालिकेत तळाला गेल्याचे पाहायला मिळाले. या सर्व अपयशांनंतर धोनी यापुढे आयपीएल खेळणार नाही, अशा चर्चेला उत आला होता. पण धोनीनेच यावर आता उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे धोनी यापुढे आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढेही धोनी आपल्या चाहत्यांना आयपीएलमध्ये यापुढेही दिसणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीच्या विषयाला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता पुढच्यावर्षी धोनी चेन्नईच्या संघात नेमके कोणते बदल करणार, याची उत्सुकता सर्वांना असेल. आयपीएलच्या १३व्या हंगामात आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात लढत होत आहे. चेन्नई याआधीच स्पर्धेबाहेर झाल्याने त्याच्याकडे गमवण्यासारखे काही नाही. पण किंग्ज इलेव्हन पंजाबला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. पंजाबने मोठा विजय मिळवला आणि अन्य सामन्याचे निकाल त्यांच्या बाजूने लागले तरच त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळू शकेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34QEOp3
No comments:
Post a Comment