Ads

Wednesday, November 18, 2020

ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ जाणार इंग्लंडच्या दौऱ्यावर, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक...

नवी दिल्ली: आयपीएलनंतर भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे. हा दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून तो जानेवारी महिन्यापर्यंत चालणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा थेट मोठा दौरा इंग्लंडचा असणार आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आज भारताविरुद्धच्या कसोटी मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. त्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाईल. भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरूवात ट्रेंट ब्रिज येथेून ४ ऑगस्ट रोजी होईल. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित झाला आहे. कसोटी सामन्यांची तारीख आणि स्थळ यांची घोषणा बुधवारी करण्यात आली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सवर होणार आहे. हेडिंग्लेच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ते २९ ऑगस्ट या दरम्यान खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २ ते ६ सप्टेंबर या कालावधीमध्ये ओव्हल या मैदानात खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा आणि पाचवा कसोटी क्रिकेट सामना १० ते १४ सप्टेंबर या दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानात होणार आहे. आतापर्यंत इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणइ इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रकपहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट- ट्रेंट ब्रिज दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर- ओव्हल पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर- ओल्ड ट्रॅफर्ड.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pCgMWV

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...