Ads

Tuesday, November 17, 2020

फेसबुक लाइव्ह करून क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी; खेळाडूने मागितली माफी

नवी दिल्ली: बांगलादेशचा क्रिकेटपटू याला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या घटनेनंतर त्याने सोशल मीडियावर माफी देखील मागितली. जाणून घ्या काय आहे नेमके प्रकरण... शाकिब अल हसन कोलकातामध्ये काली पूजा करण्यासाठी आला होता. याच दरम्यान त्याला फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मोहसिन तालुकतार नावाच्या एका व्यक्तीने फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओ शेअर केला आणि त्यातून शाकिबला जीवे मारण्याची धमकी दिली. वाचा- संबंधित व्यक्तीने व्हिडिओत म्हटले होते की, शाकिबला मारण्यासाठी जर मला ढाकाला जावे लागले तरी मी जाणार. शाकिबवर फिक्सिंग प्रकरणी बंदी घातली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने शाकिबवर ईश्वर निंदेचा आरोप केलाय. बांगलादेशच्या सिलहट शहरातील मोहसिन तालुकदारने शाकिबच्या या कृतीमुळे मुस्लिम लोकांचा अपमान झाल्याचे म्हटले आहे. शाकिबला मारण्यासाठी मला ढाकाला यावे लागले तर मी येईन. या धमकीच्या व्हिडिओनंतर शाकिब अल हसनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने माफी मागितली आहे. वाचा- मी एक मुस्लिम व्यक्ती असल्याच्या नात्याने जर मी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर सर्वांची माफी मागतो. त्याच बरोबर त्याने कोलकातामध्ये काली पूजा करण्यासाठी गेलो नव्हतो तर फक्त त्या कार्यक्रमात भाग घेतला होता. तुम्ही कार्यक्रमाचे कार्ड पाहिले तर तुम्हला लक्षात येईल असे तो म्हणाला. वाचा- संबंधित कार्यक्रमात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री फिरहद हकीम यांनी मी येण्याआधी कार्यक्रमाचे उद्धाटन केल्याचे शाकिबने सांगितले. मी जेव्हा तेथे गेलो होते तेव्हा धर्मावर चर्चा झाली नव्हती. माझ्या मते इस्लाम हा शांततेचा धर्म आहे. मी नेहमी इस्लामचे पालन करतो. आपण चुका करतो पण त्याच बरोबर एक चांगला मुस्लिम होण्याचा देखील प्रयत्न करत असतो. वाचा- कोलकातामध्ये १२ नोव्हेंबर रोजी शाकिब एका कार्यक्रमात आला होता. तेव्हा त्याने हे शहर माझ्या घरा सारखे आहे. येथे येण्याची संधी मी कधीच सोडत नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32TAHa5

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...