नवी दिल्ली: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १६ नोव्हेंबर २०१३ रोजी निवृत्त घेतली. सचिनच्या निवृत्तीला सात वर्ष झाली. या निमित्ताने त्याने क्रिकेटमधील अखेरच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सचिनने त्याचा अखेरचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. तेव्हा वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आणि सचिनचा खास दोस्त ब्रायन लाराने एक खास गिफ्ट दिले होते. वाचा- सचिनने त्याच्या २४ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये अनेक विक्रम केले. सचिनने फेअरवेल सामना खेळला तेव्हा आभाराची मोठी यादीच वाचली होती. सचिनने २०० कसोटी सामने खेळले. अखेरची लढत मुंबईत वेस्ट इंडिज विरुद्ध खेळली. वाचा- वाचा- काल सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट करून वेस्ट इंडिज बोर्डाने एक खास गिफ्ट दिले होते. सचिनला वेस्ट बोर्ड आणि लाराने एक स्टील ड्रम गिफ्ट दिले होते. या गिफ्टसाठी मी नेहमीच आभारी असेन. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि सम्मान दिल्यासाठी आभारी. वाचा- सचिनने त्याच्या अखेरच्या कसोटी सामन्यात ७४ धावा केल्या होत्या. नरसिंह डियोनरेनच्या चेंडूवर डॅरेन सॅमीने सचिनचा कॅच घेतला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36MmgG7
No comments:
Post a Comment