Ads

Wednesday, November 18, 2020

संधी मिळाली नाही म्हणून भारतीय क्रिकेटपटूने घेतला हा टोकाचा निर्णय...

नवी दिल्ली: भारतीय संघातील एका माजी जलद गोलंदाज क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताचा माजी जलद गोलंदाज सुदीप त्यागीने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सुदीपने लहान वयात क्रिकेटला राम राम केला. सुदीपला दिर्घकाळापासून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये संधी न मिळाल्याने त्याने हा निर्णय घेतलाय. त्यागीने भारतीय संघाकडून चार वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३ विकेट घेतल्या. या शिवाय त्याने भारतीय संघाकडून एक टी-२० सामना खेळला आहे. भारताकडून तो अखेरचा २०१० मध्ये खेळला होता. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघाकडून १४ सामने खेळला आहे. मी आतापर्यंत जितके निर्णय घेतले त्यापैक हा सर्वात अवघड निर्णय होता. माझ्या स्वप्नाना गुडबाय म्हणतोय, असे ट्विट सुदीप त्यागीने केले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४१ प्रथम श्रेणी सामन्यात १०९ विकेट घेतल्या. तर २३ लिस्ट ए सामन्यात ३१ विकेट घेतल्या आहेत. तो आयपीएलच्या २००९ आणि २०१०च्या सत्रात खेळला होता. एका खेळाडूचे जे स्वप्न असते ते पूर्ण करण्यासाठी मी सर्व काही केले. देशाचे प्रतिनिधित्व केले. मी महेंद्र सिंह धोनीचे आभार व्यक्त करतो. त्याच्या नेतृत्वाखाली मला पहिली वनडे खेळण्याची संधी मिळाली. त्याच बरोबर मी मोहम्मद कैफ, आरपी सिंह आणि सुरेश रैना यांचे आभार मानतो, असे सुदीप त्यागीने म्हटले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UzZbAP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...