Ads

Wednesday, November 18, 2020

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: मस्त चाललंय आमचं...

मेलबर्न: भारताविरुद्धची आगामी मालिका आव्हानात्मक असेलच; पण सध्या करोनाचा कालावधी असल्याने खेळाडूंना स्पर्धांच्या बरेच दिवसआधीपासून जैवसुरक्षित वातावरण अन् विलगीकरणात रहावे लागते. अशावेळी कुटुंबियांपासून दुरावा असतो; पण ऑस्ट्रेलिया संघ या नियमांचे काटेकोर पालन करत असून भारताविरुद्धच्या मालिकेसाठी उत्सुक आहे, असे यजमान ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने सांगितले. 'हे असे राहणे एक सूरी असले तरी 'मस्त चाललंय आमचं', असे कॅरी म्हणाला. वाचा- इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेत भाग घेतलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अन् निवड झालेले इतर खेळाडू गेल्या काही दिवसांपासून सिडनीत विलगीकरणात रहात आहेत. आयपीएलही जैवसुरक्षित वातावरणातच पार पडली. आयपीएलमधील ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय संघासह सिडनीत दाखल झाले. त्यामुळे विराट आणि कंपनीही विलगीकरणात आहे. येत्या २७ नोव्हेंबरला उभय संघांत सिडनी क्रिकेट मैदानात वनडे मालिकेतील पहिली लढत होईल. हॉटेल रुममध्ये राहणे, तिथेच जेवण आणि इतर गोष्टी. फक्त सरावाच्या निमित्ताने खेळाडू बाहेर येतात. 'हे सगळे खूपच कडक शिस्तीचे आहे; पण एकप्रकारे चांगलेच आहे. सराव आटोपून आम्ही हॉटेल रूममध्ये परतलो की पुन्हा आपापल्या रूममध्ये एकटेच असतो. कुणाची काहीच बोलणे नसते', अशी माहिती कॅरीने दिली. वाचा- सकाळी नऊ वाजता सरावाची वेळ असते अन् सगळेच त्याची आतुरतेने वाट बघत असतात, अशी माहितीही त्याने दिली. ऑस्ट्रेलियात तसे बघायला गेले तर करोना आटोक्यात होता; पण अलीकडेच अॅडलेडला करोना संसर्गाची मोठी लाट आली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nCMOAa

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...