Ads

Friday, November 13, 2020

क्रिकेटपटूने केला दुसऱ्यांदा साखरपुडा; पहिल्या पत्नीपासून आहेत पाच मुलं

नवी दिल्ली: क्रिकेट संघाचा कर्णधार याने दुसऱ्यांदा विवाह केला आहे. अफगानला पहिल्या पत्नीपासून पाच मुले आहे. अफगान सध्या देशाच्या कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिनही संघाचे नेतृत्व करतोय. काबुलमध्ये राहणाऱ्या अफगानने यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. पण त्याच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियाद्वारे सर्वांना कळाली. वाचा- असगर अफगानने आतापर्यंत ४ कसोटी, १११ वनडे आणि ६९ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे २४९, २ हजार ३५६, १ हजार २४८ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने वनडेत ३ तर टी २०त एक विकेट घेतली आहे. त्याने २००९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वनडेतील त्याची सरासरी २४.५४ तर स्ट्राइक रेट ६६.७२ इतका आहे. टी-२०मध्ये त्याने १०७.५८च्या स्ट्राइक रेटने आणि २१.१५च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वखाली अफगाणिस्तानने १०७ पैकी ७१ सामन्यात विजय मिळवला आहे. तो अफगाणिस्तानचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. वाचा- इब्राहिम नावाच्या एक वरिष्ठ पत्रकाराने असगरच्या दुसऱ्या साखरपुड्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. इब्राहिमने ट्विट मध्ये म्हटले आहे की, अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगानने दुसऱ्यांदा साखरपुडा केला आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून पाच मुले आहेत. त्यात एका मुलगा देखील आहे. वाचा- फेब्रुवारी २०१५ मध्ये मोहम्मद नबीकडून असगरला संघाचे नेतृत्व मिळाले होते. पण गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपच्या दोन महिने आधी एप्रिल महिन्यात त्याच्याकडून नेतृत्व काढून घेतले होते. असगरच्या ऐवजी गुलबदीन नायबला वर्ल्ड कपसाठी कर्णधार केले होते. पण स्पर्धेत त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. त्यानंतर फिरकीपटू राशिद खानकडे कर्णधारपद सोपवण्यात आले, तर असगरला उपकर्णधार, पण डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा बोर्डाने असगर अफगानकडे नेतृत्व सोपवले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ul3a47

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...