Ads

Sunday, March 7, 2021

Mumbai Indians full Schedule: मुंबई इंडियन्सला जेतेपदाचे षटकार मारण्याची संधी, या मैदानावर खेळणार सर्वाधिक सामने

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेतील सर्व लढती देशातील ६ शहरात होणार आहे. करोना व्हायरसमुळे २०२० चे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. आता ही स्पर्धा पुन्हा एकदा भारतात आली आहे. स्पर्धेतील पहिली लढत ९ एप्रिल रोजी चेन्नईत गतविजेता आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स यावर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरेल आणि त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्याशी होणार आहे. वाचा- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली विजेतेपद मिळवले होते. जर त्यांनी या वर्षी विजेतेपद मिळवले तर ती हॅटट्रिक ठरेल. आयपीएल २०२१ची पहिली लढत ९ एप्रिल रोजी चेन्नईत होईल. ही लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. तर जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्लेऑफच्या लढती आणि ३० मे रोजी फायनल मॅच होणार आहे. वाचा- मुंबई इंडियन्सचे सामने ९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई १३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई १७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई २० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई २३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई २९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली १ मे- विरुद्ध CSK- दिल्ली ४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली ८ मे- विरुद्ध RR- दिल्ली १० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू १३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू १६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू २० मे- विरुद्ध RCB- कोलकाता २३ मे- विरुद्ध DC- कोलकाता मुंबईचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन लढती खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या लढती या दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3v6B6SW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...