![](https://maharashtratimes.com/photo/81683122/photo-81683122.jpg)
पुणे: भारतीय क्रिकेट संघाच्या मधळ्या फळीतील फलंदाज ( )च्या प्रकृतीबाबतचे नवे अपडेट आले आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे मालिकेतील उर्वरीत सामने खेळू शकणार नाही असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आता श्रेयसच्या दुखापतीसंदर्भातील नवे अपडेट आले आहेत. त्यानुसार येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या हंगामात श्रेयस खेळू शकणार नाही. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अय्यरवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ज्यामुळे त्याला किमान चार महिने क्रिकेट खेळता येणार नाही. वाचा- बीसीसीआयमधील एका सूत्रांनी सांगितले की, त्याच्यावर ऑपरेशन करावे लागणार. आयपीएलच्या फक्त पहिल्या सत्रात नाही तर पूर्ण स्पर्धेतून तो बाहेर होणार आहे. त्याला नेट्समध्ये परत येण्यास किमान चार महिने लागण्याची शक्यता आहे. त्याची दुखापत गंभीर आहे. श्रेयसला इंग्लिंश काउंटी टीम लंकाशर संघाकडून वनडे मालिका खेळायची आहे. सोमवारी लंकाशरने यासंदर्भात कराराची घोषणा केली. काउंटी सत्र २३ जुलैपासून सुरू होणार आहे. श्रेयसला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. शार्दुल ठाकूरने टाकलेल्या चेंडूवर जॉनी बेयरस्टोने मारलेला शॉट अडवण्यासाठी त्याने हवेत झेप घेतली होती. वाचा- आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. श्रेयस संघाचा कर्णधार आहे. गेल्या वर्षी दिल्ली संघाने श्रेयसच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत प्रवेश केला होता. खांद्याच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी त्याला किमान सहा आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. जर ऑपरेशन करावे लागले तर आणखी कालावधी लागेल. वाचा- श्रेयसच्या गैरहजेरीत दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंत, स्टीव्ह स्मिथ अथवा आर अश्विनकडे सोपवले जाऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f9jEYF
No comments:
Post a Comment