पुणे, : भारताने इंग्लंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत केले आणि मालिकाही जिंकली. पण मालिका विजयानतंतर जेवढी भारतीय संघाची चर्चा होताना दिसत नाही, तेवढी फक्त इंग्लंडच्या एका खेळाडूची होताना दिसत आहे. भारताने यावेळी मालिका जिंकली असली तरी इंग्लंडच्या या खेळाडूने सर्वांची मनं जिंकली आहेत. भारताच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची ७ बाद २०० अशी अवस्था झाली होती. त्यावेळी इंग्लंडकडे चांगल्या फलंदाजांची जोडी नव्हती. त्यावेळी बहुतेकांनी हा सामना इंग्लंड सहजपणे पराभूत होईल, असे म्हटले होते. पण तसे मात्र झाले नाही. कारण हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर सर्वात जास्त चर्चा रंगली ती इंग्लंडच्या सॅम करनच्या नावाचीच. सॅमने या सामन्यात धडाकेबाज खेळी साकारली. तळाच्या फलंदाजांना हाताला घेत सॅमने भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि सामन्यात रंगत भरली. सॅमने यावेळी एकहाती सामना फिरवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यामध्ये यश मिळाले नाही. सॅम यावेळी मॅचविनर होऊ शकला नसला तरी त्याने सामनावीराचा पुरस्कार मात्र पटकावला. त्याचबरोबर सॅमने यावेळ सर्वांचीच मनं जिंकल्याचेही पाहायला मिळाले. सॅमने तिसऱ्या वनडे सामन्यात ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ९५ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर आदिल रशिदबरोबर ५७ आणि मार्क वुड यांच्याबरोबर ६० धावांची भागीदारीही रचली. यामध्ये सर्वाधिक धावा या सॅमच्याच होत्या. सॅमने अखेरच्या षटकांमध्ये भारताच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केला. पण सॅमला यावेळी इंग्लंडला सामना जिंकवून देता आला नाही. इंग्लंडला जर सॅमने हा सामना जिंकून दिला असता तर त्यांना मालिकाही जिंकता आली असती, त्याचबरोबर सॅमची ही खेळी अविस्मरणीय अशीच ठरली असली. पण सॅमने सामना जिंकवून दिला नसला तरी त्याची खेळी हा सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांनी आता आयपीएलही खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये सॅम हा मॅचविनर ठरतो का, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2O0ZK6U
No comments:
Post a Comment