
पुणे: 1st ODI सलामीवीर ( ) कर्णधार () यांच्या पाठोपाठ केएल राहुल आणि क्रुणाल पंड्या यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडला विजयासाठी ३१७ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ९८ धावा केल्या. त्याचे शतक फक्त दोन धावांनी हुकले. वाचा- पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघाकडून क्रुणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पण केले. तर विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतच्या ऐवजी केएल राहुलला स्थान दिले गेले. वाचा- भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. खेळपट्टी आणि इंग्लंडच्या गोलंदाजीमुळे भारताला वेगाने धावा करता आल्या नाही. सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. १६व्या षटकात बेन स्टोक्सने रोहित शर्माला २८ धावांवर बाद केले आणि भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखर सोबत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या दोघांनी १०५ धावांची भागिदारी केली. ही जोडी चांगली खेळत असताना विराट कोहली ५६ धावा करुन बाद झाला. वाचा- ... विराटच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यरला देखील धावा करण्यात अपयश आले. तो ६ धावा करून बाद झाला. दरम्यान शतकाजवळ पोहोचलेला शिखर ९८ धावांवर बाद झाला. शिखरने १०६ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांसह ९८ धावा केल्या. त्याला बेन स्टोक्सने बाद केले. तर हार्दिक पंड्या १ धावाकरून माघारी परतला. हार्दिक बाद झाला तेव्हा भारताने ४०.३ षटकात २०५ धावा केल्या होत्या. वाचा- पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या क्रुणाल पंड्याने केएल राहुल () सह अखेरच्या १० षटकात फटके बाजी केली आणि धावांचा वेग वाढवला. या दोघांनी ५६ चेंडूत १०० धावांची भागिदारी केली. भारताने अखेरच्या १० षटकात ११२ धावा केल्या. राहुलने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६२ धावा केल्या. तर क्रुणालने ३१ चेंडूत ५८ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ३ तर मार्क वुडने दोन विकेट घेतल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cd17sm
No comments:
Post a Comment