दुबई : भारतीय संघाने नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजय मिळवला. भारतीय संघाने मालिकेत पिछाडीवर असताना शानदार कमबॅक केले आणि मालिका ३-२ने जिंकली. या मालिकेत भारताचा कर्णधार ()ने तीन अर्धशतक झळकावली. याचा फायदा विराटला क्रमवारीत झाला. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत विराट कोहलीने पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराटने ३ अर्धशतकासह सर्वाधिक धावा केल्या होत्या. बुधवारी आयसीसीने टी-२०ची ताजी क्रमवारी जाहीर केली. यात विराटने फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. पहिल्या तीन स्थानामध्ये कोणताही बदल झाला नाही. वाचा- याआधी क्रमवारीत भारतीय संघातील केएल राहुल चौथ्या स्थानावर होता. त्याला टी-२० मालिकेत धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे विराटने त्याला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. क्रमवारीत राहुल आता पाचव्या स्थानावर आहे. वाचा- विराटने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यात ११५च्या सरासरीने २३१ धावा केल्या. ३ अर्धशतकामध्ये नाबाद ८० ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. मालिकेतील अखेरच्या लढतीत विराटने रोहितसह डावाची सुरूवात केली होती. वाचा- क्रमवारीत इंग्लंडचा डेव्हिड मलान ८९२ गुणांसह पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंच ८३० गुणांसह दुसऱ्या तर पाकिस्तानचा बाबर आझम ८०१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विराटचे ७६२ गुण तर राहुलेच ७४३ गुण आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tP8v3d
No comments:
Post a Comment