पुणे: भारताने तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आणि मालिका २-१ने जिंकली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३२९ धावा केल्या. उत्तरा दाखल इंग्लंडला ९ बाद ३२२ धावा करता आल्या. या सामन्यात भारतीय संघाने एक अनोखा विक्रम केलाय. वाचा- भारतीय संघ १९७४ पासून वनडे सामने खेळत आहे. गेल्या ४७ वर्षात भारताने प्रथमच सलग सहा वनडे सामन्यात ३०० पेक्षा अधिक धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तीनही सामन्यात भारताने ३००पेक्षा अधिक धावा केल्या. त्याआधी भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन वनडेत ३००पेक्षा अधिक धावा केल्या. वाचा- इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत ३१७, दुसऱ्या वनडेत ३३६ तर तिसऱ्या वनडेत ३२९ धावा केल्या. भाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत ३०८, ३३८ आणि ३०२ धावा केल्या होत्या. पण तेव्हा भारताने पहिल्या दोन लढती गमावल्या होत्या तर अखेरची लढत जिंकली होती. वाचा- रोहित शर्मा ठरला अपयशी भारतीय संघाचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ९० धावा केल्या. त्याने पहिल्या वनडेत २८, नंतर २५ तर अखेरच्या सामन्यात ३७ धावा केल्या. रोहितने चांगली फलंदाजी केली असली तरी त्याला मोठी धावासंख्या करता आली नाही. मालिकेत त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. २०१३ नंतर प्रथमच रोहितला एखाद्या वनडे मालिकेत अर्धशतक करता आले नाही. वाचा- २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहितला अर्धशतक करता आले नव्हते. त्या मालिकेत रोहित अखेरची मॅच खेळला नव्हता. रोहितने आफ्रिकेविरुद्धच्या त्या मालिकेत १८, १९ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w9hNJq
No comments:
Post a Comment