मुंबई : भारताचा चर्चेतला खेळाडू सूर्यकुमार यादव इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यावर थेट मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे. सूर्यकुमारला खऱ्या अर्थाने ओळक मिळवून दिली ती मुंबई इंडियन्सने. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल्यावर सूर्यकुमारने आपली पहिली प्रतिक्रीया दिला आहे. सूर्यकुमारचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल्यावर म्हणाला की, " सध्याच्या घडीला मी सर्वात आनंदी आहे. कारण भारतीय संघाकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते आणि आता ते साकार झाले आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. भारतीय संघाचे एक भाग होणे, ही माझ्यासाठी सुखावणारी गोष्ट आहे. पण आता भारतीय संघाची जबाबदारी संपलेली आहे आणि आता मी माझ्या कुटुंबामध्ये दाखल झालो आहे. मुंबई इंडियन्स हे माझ्या घरासारखेच आहे. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी मी सज्ज झालो आहे." सूर्यकुमार गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण फलंदाजी करत आहे. गेल्या हंगामातही सूर्यकुमारने दमदार फलंदाज केली होती. त्यामुळेच त्याला जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी संधी मिळाली नव्हती, तेव्हा बऱ्याच चाहत्यांना वाईट वाटले होते. त्यानंतर चाहत्यांनी विराट कोहली आणि भारतीय निवड समितीला ट्रोलही केले होते. पण अखेर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सूर्यकुमारची भारतीय संघात निवड करण्यात आली. सूर्यकुमारने पदार्पणातच दिमाखदार कामगिरी केली आणि आपले संघातील स्थान टिकवले आहे. सूर्यकुमार हा मुंबई इंडियन्सच्या संघाचा अक अविभाज्य भाग बनलेला आहे. कारण जेव्हा कर्णधार रोहित शर्मा किंवा अन्य फलंदाज लवकर बाद होतात, तेव्हा सूर्यकुमार संघाचा डाव सारवत असतो आणि हे आतापर्यंत सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे आता भारतीय संघातून खेळल्यानंतर सूर्यकुमार मुंबई इंडियन्सकडून खेळताना कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यावर सूर्यकुमार मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे. त्यामुळे आता सराव करण्यात सूर्यकुमार मग्न असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tYGxly
No comments:
Post a Comment