पुणे, : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा पंचांचा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मैदानात खेळत असलेला भारताचा धडाकेबाज फलंदाज नाराज झाल्याचेही पाहायला मिळाले. पंचांच्या एका चुकीमुळे यावेळी भारतीय संघाला चांगलाच फटका बसला आहे. कारण यावेळी भारतीय संघाचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय...ही गोष्ट घडली ती ४०व्या षटकामध्ये. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टॉम करन हा गोलंदाजी करत होता. या षटकाच्या अखेरच्या चेंडूंवर ही गोष्ट घडली. या चेंडूवर रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न रिषभ पंतने केला. त्यावेळी मैदानावरील पंचांनी पंतला पायचीत (LBW) असल्याचा निर्णय दिला आणि त्याला बाद दिले. त्यावेळी हा चेंडू सीमापारही गेला होता. पण पंचांनी बाद दिल्यावर पंतने यावेळी डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिसऱ्यां पंचांनी पुन्हा हा चेंडू पाहिला तेव्हा पंतची बॅट चेंडूला लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी यावेळी पंत नाबाद असल्याचा निर्णय दिला. पण यावेळी भारताचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचे कोणते नुकसान झाले, पाहा... तिसऱ्या पंचांनी पंत नाबाद असल्याचा निर्णय दिला. पण त्यानंतरही भारताला चार धावा मिळू शकल्या नाहीत. कारण मैदानावरील पंचांनी पंतला बाद दिले होते, या निर्णयाच्या विरोधात पंतने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली होती. त्यामुळे हा चेंडू डेड असल्याचे पंचांनी जाहीर केले आणि भारतीय संघाला एकही धाव मिळू शकली नाही. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्वाची असते. कारण एका धावेमुळे सामन्याच्या निकाल बदलू शकतो, हे आपण पाहिले आहे. पण भारतीय संघाला तर यावेळी चार धावा पंचांच्या चुकीमुळे मिळाल्या नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सोशल मीडियावर याबाबत चांगलीच चर्चा झाली. त्याचबरोबर पंचांच्या चुकीचा भारतीय संघाला फटका का, असा सवालही यावेळी चाहत्यांनी सोशल मीडियावर विचारला आहे. त्यामुळे या नियमाबाबत स्पष्टता हवी, असेही चाहत्यांनी म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dcyKtA
No comments:
Post a Comment