मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत आयपीएलचे पाचवेळा विक्रमी जेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर यावर्षी विजयी हॅट्रिक साजरी करण्यासाठी रोहितच्या शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. पण यावर्षी मुंबई इंडियन्सचा संघ कुठपर्यंत मजल मारेल, याबद्दलचे भाकित भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. गावस्कर म्हणाले की, " मुंबई इंडियन्सला पराभूत करणं, हे सर्वात कठीण काम आहे. कारण आतापर्यंत मुंबई इंडियन्सचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे आपण पाहिले आहे. मुंबई इंडियन्समधील खेळाडूंनी भारतीय संघातून खेळताना दिमाखदार कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी पदार्पणातच धमाकेदार कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्या आता गोलंदाजी करत असून मुंबई इंडियन्ससाठई ही जमेची बाजू असेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे खेळाडू आयपीएलपूर्वीच चांगल्या फॉर्ममध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे." गावस्कर पुढे म्हणाले की, " मुंबई इंडियन्स यावर्षीही आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकते. कारण मुंबईचा संघ मुख्य दावेदारांपैकी एक आहे. रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व आहे. त्याचडबरोबर सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक आणि कृणाल पंड्या, जसप्रीत बुमरा, कायरन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, असे दर्जेदार खेळाडू मुंबई इंडियन्सकडे आहेत. त्यामुळेच मुंबई इंडियन्सला पराभूत करणे, ही सोपी गोष्ट नक्कीच नाही." मुंबई इंडियन्सचा संघ यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन लढती खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या लढती या दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील. मुंबई इंडियन्सने २०१९ साली देखील मुंबईने विजय मिळवला होता. आता मुंबईला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m43nWk
No comments:
Post a Comment