मुंबई : सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील वातावरण चिंताजनक आहे आणि त्यामुळेच बरेच राजकारणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेताना पाहायला मिळतात. पण आज भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली आहे. यावेळी रवी शास्त्री यांचा फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने रविवारी इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना जिंकला आणि मालिका २-१ अशी खिशात टाकली. त्यानंतर आता भारतीय संघातील खेळाडू मुंबईत दाखल झाले असून ते आयपीएलच्या तयारीला लागलेले आहेत. पण रवी शास्त्री यांनी मात्र आज महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोणत्याही क्रीडापटू किंवा खेळाशी संबंधित असलेल्या व्यक्तीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले नव्हते. पण रवी शास्त्री यांनी त्यांची भेट घेतली. पण या भेटीमध्ये नेमकं घडलं तरी काय, हे जाणून घ्यायची इच्छा सर्वांनाच आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचे सध्यातरी समजत आहे. पण या भेटीमध्ये नेमका काय संवाद झाला, हे अजून समजू शकलेले नाही. न्यूज९ या मीडियाने रवी शास्त्री आणि भगत सिंह कोश्यारी यांचा फोटो ट्विट केला आहे. यावर्षी आयपीएल ९ एप्रिलला सुरु होणार आहे. पण आयपीएलमध्ये रवी शास्त्री यांचे काहीच काम नाही. कारण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असल्यामुळे ते कोणत्याही संघाला मार्गदर्शन करु शकत नाही. त्याचबरोबर ते समालोचनही करु शकत नाही. त्यामुळे सध्या जवळपास दीड महिने तरी त्यांना विश्रांती असणार आहे. पण त्यानंतर मात्र भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे या विश्रांतीमध्ये रवी शास्त्री यांना संघाची रणनिती आखण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. कारण यावर्षी भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघ महत्वाच्या इंग्लंडच्या दौऱ्यावरही जाणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sF8YVE
No comments:
Post a Comment