नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये काही मोजक्या खेळाडूंना मारण्याची कामगिरी करता आली आहे. काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात हा पराक्रम केला होता. आता आणखी एका खेळाडून अशी कामगिरी केली आहे. वाचा- श्रीलंकेचा ऑलराउंडर तिसारा परेरा()चा रविवारी या खास यादीत समावेश झाला. एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारणारा तो श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. लंकेतील एका देशांतर्गत स्पर्धेत परेराने ही कामगिरी केली. मेजर क्लब्स लिमिटेड ओव्हर स्पर्धेच्या ग्रुप ए मधील लढतीत परेराने हा पराक्रम केला. ही मॅच श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लब आणि ब्लूमफिल्ड क्रिकेट आणि एथलेटिक क्लब यांच्यात झाली. वाचा- पावसामुळे ही लढत ५० षटकांच्या ऐवजी ४१ षटकांची झाली. श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लबने ३ विकेटच्या बदल्यात ३१८ धावा केल्या. यात कर्णधार परेराने धमाकेदार फलंदाजी केली. परेराने दिलहान कुरे या गोलंदाजाच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. त्याने ४ षटकात ७३ धावा दिल्या. या सामन्यातील दुसऱ्या डावात पुन्हा पावसाचा अडथळा आला. तेव्हा प्रतिस्पर्धी संघाने १७ षटकात ६ विकेटच्या बदल्यात ७३ धावा केल्या होत्या. पावसामुळे सामना अनिर्णित घोषीत केला गेला. वाचा- क्रिकेट विश्वास एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा परेरा हा नववा खेळाडू ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी कामगिरी सहा खेळाडूंनी केली आहे. तर आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये हर्शल गिब्स, युवराज सिंग आणि कायरन पोलार्ड यांनी ही कामगिरी केली आहे. वाचा- गॅरी सोबर्स यांनी सर्व प्रथम १९६८ साली एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते. भारताच्या रवी शास्त्री यांनी देखील १९८५ मध्ये अशी कामगिरी केली. त्यानंतर २२ वर्ष कोणाला सहा षटकार मारता आले नाही. २००७च्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलँड विरुद्ध ही कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारणारा तो पहिला फलंदाज होता. त्यानंतर युवराज सिंगने टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सहा षटकार मारले. दहा वर्षानंतर इंग्लंडच्या रॉस वाइटलीने यॉकशर वाइकिंग्सविरुद्ध नेटवेस्ट टी-२० ब्लास्टमध्ये एका षटकात सहा सिक्स मारले. तर अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह जजईने २०१८ तर २०२० मध्ये न्यूझीलंडच्या लियो कार्टरने ही कामगिरी केली. लिस्ट ए च्या लढतीत सहा षटकार मारणारा परेरा हा दुसरा क्रिकेटपटू आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sx4791
No comments:
Post a Comment