Ads

Sunday, March 28, 2021

भारत दौऱ्यावर इंग्लंडचा क्लीन स्वीप; सर्वात निराशजनक कामगिरी

पुणे: भारत दौऱ्यावर इंग्लंडचा क्लीन स्वीप झाला. कसोटी, टी-२० नंतर वनडे मालिकेत देखील इंग्लंडचा पराभव झाला. रविवारी झालेल्या वनडे मालिकेतील अखेरच्या लढतीत भारताने विजय मिळवत मालिका २-१ने खिशात घातली. इंग्लंडसाठी भारत दौरा हा अतिशय निराशजनक ठरला. त्यांना एकाही मालिकेत विजय मिळवता आला नाही. वाचा- अखेरच्या वनडेत कमालीची सुरस पाहायला मिळाली. पण इंग्लंडचा सात धावांनी पराभव झाला. भारतीय दौऱ्याची सुरूवात कसोटी मालिकेने झाली होती. पहिल्याच लढतीत इंग्लंडने शानदार विजय मिळवला होता. पण त्यानंतर झालेल्या ३ कसोटीत भारताने विजय मिळवत कसोटी मालिका ३-१ने जिंकली. कसोटी मालिकेतील विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता भारताची लढत १८ जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. वाचा- कसोटी मालिकेनंतर झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत देखील इंग्लंडने विजयाने सुरूवात केली. नंतर मालिकेत त्यांनी २-१ अशी आघाडी देखील घेतली होती. पण पुन्हा अखेरच्या दोन लढतीत विजय मिळवत भारताने टी-२० मालिका ३-२ने जिंकली. वाचा- तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मात्र भारताने प्रथम विजय मिळवला. दुसऱ्या वनडेत इंग्लंडने धमाकेदार फलंदाजी करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. अखेरच्या लढतीत शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने बाजी मारली. भारत दौऱ्यात इंग्लंडने ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वनडे असे १२ सामने खेळले त्यापैकी त्यांना फक्त चार लढती जिंकता आल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m1rMMn

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...