पुणे, : भारताने इंग्लंडवर वनेड मालिकेत २-१ असा विजय मिळवला. पण विजय मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली एक गोष्ट करत असल्याचे पाहायला मिळाला. विराटचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विराट कोहली या व्हिडीओमध्ये नेमकं काय करतोय, ते पाहा... विराटने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि वनडे मालिकेत चांगली फलंदाजी करत असला तरी त्याला गेल्या ४९१ दिवसांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. करोनामुळे काही काळ वाया गेला असला तरी बाकिच्या खेळाडूंनी मात्र शतक झळकावले आहे. पण कोहलीला गेल्या १६ महिन्यांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळेच कोहलीवर पुन्हा एकदा ही नामुष्की ओढवल्याचे पाहायला मिळत आहे. एखादी मालिका जिंकल्यावर दुसऱ्या दिवशी कोणताही खेळाडू थोडासा रीलॅक्स मुडमध्ये असू शकतो. पण कोहलीचे वेगळेपण इथेच सिद्ध होते. कारण मालिका जिंकल्यावर दुसऱ्या दिवशीही कोहली जिमममध्ये गेला आणि त्याने व्यायाम केल्याचे पाहायला मिळाले आहे. आता काही दिवसांमध्येच आयपीएललाल सुरुवात होणार आहे. त्यावेळी विराटकडे आरसीबीच्या संघाचे नेतृत्व असेल. त्यामुळे आता आयपीएलसाठी विराट जोरदार तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विराटच्या व्यायामाचा व्हिडीओ यावेळी चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. विराट अजूनही ठरलाय अपयशी...आयपीएलमध्ये विराट कोहली हा एक कर्णधार म्हणून अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे आता विराटवर अधिक दडपण असल्याचे म्हटले जात आहे. कारण रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळताना संघाला तब्बल पाचवेळा जेतेपद पटकावून दिले आहे, हा आयपीएलमधील एक विक्रमही आहे. पण कोहलीला मात्र एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीकडून कशी कामगिरी होते आणि तो आरसीबीला जेतेपद जिंकवून देतो का, याची उत्सुकता नक्कीच यावेळी सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PIeacQ
No comments:
Post a Comment