मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये लॉकडाऊनचा इशारा दिलेला आहे. जर राज्यातील नियम कडकपणे पाळले गेले नागीत, तर महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन पुन्हा लावण्यात येऊ शकतो, असे ठाकरे म्हणाले आहेत. पण ठाकरे यांच्या या निर्णयानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने आपले मत व्यक्त केले आहे. हरभजनचे ट्विट आता चांगलेच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. करोनाबाबतचे जे नियम आहेत ते लोकं पाळत नसल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे हे असेच सुरु राहिले तर लॉकडाऊन लावाले लागेल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले होते. ठाकरे यांच्या या मतानंतर हरभजन लोकांवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. हरभजनने याबाबत एक ट्विट केले आहे. याबाबत हरभजन म्हणाला की, " लोकांना नेमकं काय करावं हेच समजत नसेल तर लॉकडाऊन लावायलाच हवं. ही लोकं कधी समजूतीने वागणार, हेच समजत नाही..." महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वात जास्त करोनाचे रुग्ण आढळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे जर परिस्थिती आणखीन खालावत गेली तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिला आहे. देशात करोनाच्या नवीन रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरण मोहीमेबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज माहिती दिली. देशात प्रामुख्याने १० जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बेंगळुरू शहर यांचा यात समावेश आहे. राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सीजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w7kueF
No comments:
Post a Comment