पुणे: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत वनडे मालिका २-१ने जिंकली. या विजयासह भारताने दौऱ्यातील सर्व मालिका जिंकण्याचा पराक्रम देखील केला. तिसऱ्या आणि अखेरच्या लढतीत दोन्ही संघांनी धावांचा डोंगर उभा केला. वाचा- वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या सर्व द्विपक्षीय मालिकेतील विक्रम या मालिकेत मोडला गेला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाली. या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी मिळून एकूण ६५ षटकार मारले. वाचा- याआधी झालेल्या कोणत्याही वनडे मालिकेत इतके षटकार मारले गेले नव्हते. हा विक्रम न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या नावावर होता. २०१९ साली या दोन्ही संघात झालेल्या मालिकेत ५७ षटकार मारले गेले होते. तर २०१७ साली भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत ५६ षटकार मारले होते. या यादीत चौथ्या स्थानावर पुन्हा भारतीय संघाचा समावेश आहे. २०१९ साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेत ५५ षटकार मारले गेले होते. वाचा- वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत सर्वाधिक षटकार जॉनी बेयरस्टोने मारले. त्याने तीन सामन्यात १४ षटकार मारले. या यादीत दुसऱ्या स्थानावर बेन स्टोक्स असून त्याने ११ षटकार मारले. भारताकडून या मालिकेत ऋषभ पंतने दोन सामन्यात ११ षटकार मारले. तर हार्दिकने २ लढतीत ८ षटाकर मारले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Pe8F5u
No comments:
Post a Comment