नवी दिल्ली: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २८ मार्च हा दिवस खास आहे. याच दिवशी १९५५ साली क्रिकेटमध्ये असा एक विक्रम झाला होतो, जो विक्रम मोडण्याची कोणत्याही संघाची इच्छा नसले. ६६ वर्षांपूर्वी झालेला हा विक्रम फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सर्वात लाजिरवाणा असा होता. वाचा- इंग्लंडचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. कसोटी मालिकेतील पहिली मॅच त्यांनी जिंकली होती. दुसरा कसोटी सामना ऑकलँड येथे सुरू होती. या सामन्यातील चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने असा विक्रम केला जो कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने केलेल्या सर्वात कमी धावसंख्याचा होता. वाचा- आजच्या दिवशी न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात फक्त २६ धावांवर बाद झाला होता. न्यूझीलंड टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात २०० धावा केल्या. उत्तरादाखल इंग्लंडने पहिल्या डावात ४६ धावा केल्या. या सामन्याच्या चौथ्या दिवशी असे काही झाले ज्याचा कोणी विचार देखील केला नाही. वाचा- इंग्लंडचे कर्णधार लेन हेटन यांची ही अखेरची कसोटी होती. हेटन यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील ३६४ ही सर्वोच्च धावसंख्याचा विक्रम होता. नंतर हा विक्रम गॅरी सोबर्स यांनी ३६५ धावा करून मोडला. वाचा- या सामन्यात इंग्लंडच्या फ्रँक टायसनने गार्डन लेगेट यांना शून्यावर बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडच्या विकेट पडण्यास जी सुरूवात झाली जी थांबलीच नाही. टायलन यांनी दोन, ब्रायन स्टेथनने तीन, ब्रायन एपलयार्डने ४ विकेट घेतल्या. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि २० धावांनी जिंकला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dbV2M9
No comments:
Post a Comment