पुणे: इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका संपली आणि टीम इंडियामधील खेळाडू आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी आपआपल्या संघात दाखल झाले. ची सुरूवात ९ एप्रिलपासून होणार आहे. पहिली लढत आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. वाचा- मागे रविवारी इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार सोमवारी मुंबईत दाखल झाला. इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका भारताने २-१ने जिंकली आणि भारताचा उपकर्णधार रोहित शर्माचे पुढील मिशन सुरू झाले. मुंबई इंडियन्सने आयपीएलची पाच विजेतेपद मिळवली आहेत. आता या वर्षी त्यांची नजर सलग तिसऱ्या विजेतेपदावर असेल. वाचा- वाचा- वाचा- मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एका गाडीतून रोहित शर्मा मुंबईत दाखल झाल्याचे दिसते. रोहित शर्मा बरोबरच भारतीय संघातील हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे देखील मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाले. वाचा- मुंबई संघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव म्हणतो, भारतीय संघाचे प्रतिनिधत्व करण्याची संधी मिळाली ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. देशाकडून खेळण्याचे स्वप्न होते. आता पुन्हा मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात आलो आहे. गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विक्रमी सहावे विजेतेपद मिळवले होते. त्याआधी २०१९ साली देखील मुंबईने विजय मिळवला होता. आता मुंबईला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली विजेतेपद मिळवले होते. मुंबई इंडियन्सचे सामने ९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई १३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई १७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई २० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई २३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई २९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली १ मे- विरुद्ध CSK- दिल्ली ४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली ८ मे- विरुद्ध RR- दिल्ली १० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू १३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू १६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू २० मे- विरुद्ध RCB- कोलकाता २३ मे- विरुद्ध DC- कोलकाता मुंबईचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन लढती खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या लढती या दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u45FYl
No comments:
Post a Comment