पुणे, : भारताचा कर्णधार विराट कोहलीवर पुन्हा एकदा नामुष्की ओढवल्यचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी यावेळी कोहलीला चांगलेच धारेवर धरल्याचेही पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत भारतीय संघ सामने जिंकत आहे, त्यामुळे कोहलीबाबतच्या काही गोष्टी अजूनही सर्वांपुढे आलेल्या नाहीत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या पुढे आल्यावर तर विराटवर जोरदार टीका सुरु होऊ शकते. त्यामुळे आता विराटवर कोणती नामुष्की ओढावली आहे, याचा विचारही चाहते करत असतील. आतापर्यंत विराट चांगली फलंदाजी करत असला तरी त्याला गेल्या ४९१ दिवसांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. करोनामुळे काही काळ वाया गेला असला तरी बाकिच्या खेळाडूंनी मात्र शतक झळकावले आहे. पण कोहलीला गेल्या १६ महिन्यांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळेच कोहलीवर पुन्हा एकदा ही नामुष्की ओढवल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलनंतर कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी वनडे क्रिकेट मालिकेतही कोहलीला शतक झळकावता आले नव्हते. एकमेव कसोटी मालिकेतही कोहली अपयशी ठरला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकांमध्येही कोहलीला शतक झळकावता आलेले नाही. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिकने सामना संपल्यावर कोहलीला एक प्रश्न विचारला होता. कार्तिकने यावेळी कोहलीला विचारले होते की, एकाकाळी कोहली हा एकामागून एक शतके पूर्ण करायचा, पण सध्याच्या घडीला कोहलीकडून चांगली खेळी साकरली जात आहे. कोहली अर्धशतक करताना दिसतो, पण त्याच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये एकही शतक पाहायला मिळालेले नाही. त्यावर कोहली म्हणाला होता की, " मी कधी शतकांसाठी खेळत नाही. मी शतक करूनही भारतीय संघ पराभूत झाला तर ते मला आवडणार नाही. पण माझे शतक झाले नाही आणि भारतीय संघाने सामना जिंकला असेल, तर ते माझ्यासाठी महत्वाचे असेल. कारण मी कधीही स्वत:साठी खेळत नाही. मी नेहमीच पहिल्यांदा संघाचा विचार करत असतो."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w6vJnv
No comments:
Post a Comment