![](https://maharashtratimes.com/photo/81706510/photo-81706510.jpg)
पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी वनडे पुण्यात सुरू आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. पहिल्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्याच्या जागी संघात ऋषभ पंतला संधी मिळाली. वाचा- ऋषभ पंतने गेल्या काही महिन्यात कसोटी आणि टी-२० मध्ये धमाकेदार फलंदाजी केली आणि विकेटच्या मागे देखील चांगली कामगिरी केली. यामुळेच पंतला वनडे संघात स्थान मिळाले. दिल्लीच्या या स्टार फलंदाजाला दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी संघात स्थान मिळाले. वाचा- याआधी पंतने अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ जानेवारी २०२० मध्ये खेळली होती. मुंबईत झालेल्या त्या वनडेनंतर ४३६ दिवसांनी वनडेत विकेटकिपर म्हणून पंतला स्थान देण्यात आले. न्यूझीलंड दौऱ्यात पंत भारतीय संघात होता. तेव्हा भारताने ५ टी-२० आणि ३ वनडे मॅच खेळल्या. पण तेव्हा त्याला अंतिम ११ मध्ये निवडण्यात आले नाही. विकेटकिपर म्हणून केएल राहुलने जबाबदारी स्विकारली होती. वाचा- गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी-२० मध्ये देखील पंतला वगळण्यात आले होते. त्याच्या जागी संजू सॅमसनला निवडण्यात आले होते. पंतने कसोटीत मॅच जिंकूण देणारी खेळी साकारली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध देखील पंतने शानदार कामगिरी केली. पंतने भारताकडून आतापर्यंत फक्त १६ वनडे खेळल्या आहेत. यात त्याने १०३.६च्या स्ट्राइक रेटने ३७४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २६.७१ इतकी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dcV8TI
No comments:
Post a Comment