मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेची सुरूवात ९ एप्रिलपासून होणार असून पहिली लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू यांच्यात होईल. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स नंतरचा सर्वात यशस्वी संघ म्हणजे ( ) होय. वाचा- धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची पहिली लढत १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामामध्ये किमान प्ले ऑफमध्ये जाणाऱ्या या संघाला गेल्या वर्षी मात्र मोठे अपयश आले होते. चेन्नईचा संघ २०२० मध्ये फक्त १२ गुणांसह ७व्या स्थानावर होता. त्यंना १४ पैकी फक्त ६ सामने जिंकला आले होते. आता गेल्या वर्षीच्या आठवणी विसरून चेन्नई एक नवी सुरुवात करण्यास उत्सुक असेल. वाचा- चेन्नईच्या लढती १० एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स १६ एप्रिल- पंजाब किंग्ज १९ एप्रिल- राजस्थान रॉयल्स २१ एप्रिल- कोलकाता नाइट रायडर्स २५ एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू २८ एप्रिल- सनरायजर्स हैदराबाद ०१ मे- मुंबई इंडियन्स ०५ मे- राजस्थान रॉयल्स ०७ मे- सनरायजर्स हैदराबाद ०९ मे- पंजाब किंग्ज १२ मे- मुंबई इंडियन्स २१ मे- दिल्ली कॅपिटल्स २३ मे- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू वाचा- मैदानावर सर्वाधिक सामने या वर्षी कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर खेळता येणार नसल्याने चेन्नईचा संघ देखील चेपॉकवर खेळू शकणार नाही. चेन्नई संघाचे सर्वाधिक ५ सामने मुंबईतील वानखेडेवर होतील. चार लढती दिल्ली, ३ लढती बेंगळुरू आणि दोन लढती कोलकातामध्ये होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qrRfiy
No comments:
Post a Comment